STORYMIRROR

BABAJI HULE

Fantasy

3  

BABAJI HULE

Fantasy

जीवनशैली

जीवनशैली

1 min
366

जन्म आणि मृत्यूच्या वाटेवर अडथळ्यांची शर्यत पार करताना,

उत्क्रांतीच्या प्रवासात जीवशाश्रीय आव्हाने स्वीकरताना

तत्वज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालताना

बाह्यसृष्ठीचा अभ्यास अंतर्दृष्टीने करताना

आयुष्याच्या विविध पातळीवर जीवन जगणे म्हणजेच जीवनशैली II १ II


स्वतःला स्वकेंद्रित करून वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा

सामाजिक आणि जागतिक पातळीचा समतोल साधता साधता

आचार-विचार, आग्रह-विग्रह,शांतता-संयम,होकारकिंवा नकार

संवाद-चंगळवाद, चांगल्या आणि वाईट सवयींचा स्वीकार

शारीरिक व्याधींवरचे उपाय, व्यायाम-छंद आणि नैसर्गिक विहार

अर्थात मर्यादांचे पालन आणि स्वतःचे स्वतःवरचे नियंत्रण

भावनेला मान देणे यातील जीवन आनंद म्हणजेच जीवनशैली II २ II


दुःखात अडथळ्यांचा प्रवेशआणिपूर्वग्रहांना अरिष्टामंध्ये न येऊ देणे

अशवासकतेचा स्वीकार करणे आणि विनाअट संबंधांना वृद्धी देणे

वैयक्तिक लाभाला समूह लाभामध्ये प्रवर्तित करणे

स्वहिताला महत्व न देता परहिताला प्राधान्य देणे

 मालकी हक्कातली रसिकता कमी करणे म्हणजेच जीवनशैली II ३ II


लटका अहंकार सांभाळून स्वतःची कार्यक्षमता वाढवणे,

ज्ञानाची कक्षा रुंदावणे, रसिकता संपन्न करणे,

स्वतःच्या प्रोफेशनचा अभिमान असणे परंतु विलासीवृत्तीचा त्याग करणे,

आपले असणे दाखवणे, आपला वापर दाखवणे, आपले समाजातले मिरवणे

हेच ते काय परिस्थितीनुसार जीवन जगणे म्हणजेच जीवनशैली II ४ II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy