तुझी नी माझी भेट..!
तुझी नी माझी भेट..!
तुझी नी माझी भेट ती,
स्मरते आणिक राणी..!
आठवते मला आजही,
तू आलीस या जीवनी..!
होते मनी तुझ्या काय,
का आले अश्रू नयना..?
त्या रात्री तू मीलनाच्या,
का केला जरा बहाणा..?
मिटूनी लोचने हृदयाशी,
आलीस अशी की पुन्हा तू..!
मग जाणिले मी अंतरी,
सुख भरून वाहीलिस तू..!
खुलली खळी गालाची,
दिसला जेव्हां निशाणा..!
लाजली तू का जराशी,
मी ग बावरा दिवाना..!
फुलली रात्र ती माझी,
आलीस माझ्या कुशीत..!
उगवली पहाट माझी,
रेशमी तुझ्या मिठीत..!

