STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Fantasy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Fantasy

दिवाळी

दिवाळी

1 min
226

दुःख, दैन्य, दारिद्रय ते,

व्हावे सर्वांचे दूर

दिवाळीच्या दिव्यांचा

मिळो प्रकाश भरपूर.!


व्हावा दूर जीवनातील

सर्वच अंधकार ,

गरीबाच्या झोपडीत

अन्न मिळो पोटभर..!


डोळ्यात नको अश्रू

पुसायाला पुढे हात,

साथ दया सुखदुःखात

दिवाळी गरीबा घरात..!


दिसतील उपाशी जे

खाऊ घाला चार घास,

लावा दिप त्याच्या घरी

जिथे हवा प्रकाश..!


उघडे,नागडे,अनाथ

अपंग,भिकारी,दीन

दान धर्म करा त्याना

त्यांना दयावे खाया अन्न..!


खरी दिवाळी ती

नको फटाके, रोषणाई,

सारे राहावेत खुशाल

आनंद असो इथं लई...!


नको लाडू करंज्या

हवी पोटभर भाकर,

गरीबाघरी दिवाळी

व्हावी साजरी ती बरं..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract