STORYMIRROR

Pradnya Khadakban

Inspirational Others

3  

Pradnya Khadakban

Inspirational Others

आयुष्यातील इंद्रधनुष्य

आयुष्यातील इंद्रधनुष्य

1 min
296

काळेकुट्ट ढग दाटून येती 

पावसाचे थेंब भरभरून बरसती 


क्षणात जग अंधारून जातं

पावसामध्ये न्हावून जातं 


सूर्याची किरणे अचानक पसरती

काळेकुट्ट ढग हळुच सरती


ऊन व पाऊस घेऊन रिमझिम बरसती

इंद्रधनुषी छटा आकाशी पसरती


पावसाच्या थेंबात आनंदते सृष्टी 

ऊन पावसाच्या खेळात न्हाहते सृष्टी 


इंद्रधनुषी छटा पसरते आकाशी

हिरवाईने सजते सृष्टी


दाट धुक्याची चादर सृष्टीवरी 

रंगबिरंगी फुलांचा साज सृष्टीवरी 


आयुष्याचे रंग ही असेच आगळेवेगळे...


कधी आनंदाची लहर

कधी दुःखाची लहर


आयुष्यातील इंद्रधनुष्य...


कधी हसवतात

कधी रडवतात


पण आयुष्याची खरी चव

अनुभवातूनच देतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational