STORYMIRROR

Pradnya Khadakban

Tragedy

3  

Pradnya Khadakban

Tragedy

कोरोना झाला हैवान

कोरोना झाला हैवान

1 min
262

दूरदूरचा हा पाहुणा

नाव त्याच "कोरोना"

नको नको म्हणता

घरा घरात पोहचला


जगणं झालं बेजार

लोक झाले बेकार

संसार उजाडले अनेकांचे

पण त्याला दुःख नाही कशाचे


प्रत्येकजण देत होता लढा

त्याला हद्दपार करायचा

तो म्हणाला नियम पाळा

मी जाईल माझ्या घरा


जगण्याचा लढा आप्तस्वकीयांसाठी 

आशा आणि मनीषा घरी जाण्यासाठी

काळाची विचित्र रणनीती

झाली ऑक्सिजन गळती


बदलली कोरोनाची नीती

थांबली ऑक्सिजनची गती

कोरोना झाला हैवान

घेतले निष्पापांचे प्राण


अनेक निष्पाप पेशंट दगावले 

क्षणात अनंतात विलीन झाले

कोरोनाची लढाई थांबली

नाशकात शोककळा पसरली


जखमा झाल्या मनावरी

अश्रूनी भरली गोदावरी 

ओसंडून वाहतंय दुःख

कोरोनाने उध्वस्त केलं आयुष्य


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy