STORYMIRROR

Kishor Zote

Fantasy

3  

Kishor Zote

Fantasy

खुर्ची (वात्रटिका)

खुर्ची (वात्रटिका)

1 min
1.1K

एक खुर्ची मला

एक खुर्ची तुला

राजकारण्यांचे स्वप्न

घरात खुर्ची प्रत्येकाला


ग्रामपंचायत ते खासदारकी

साकडे घाली तिकीटाला

पक्षश्रेष्ठी आई, बाप, देव

सोडी ना त्याच्या चरणाला


नाहीच मिळाले तिकीट

अपक्ष मग फॉर्म भरला

निवडून आल्यावर पुन्हा

पक्ष प्रवेश जंगी जाहला


विरोधकांची ऑफर खुर्ची

फारकत देती मग पक्षाला

सत्ता न् खुर्ची सत्ता न् खुर्ची

जपायचे याच जपमाळेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy