STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama

3  

Gaurav Daware

Comedy Drama

विशाल कुत्रा

विशाल कुत्रा

1 min
259

आज सांगावी वाटते एक कविता भारी

थोडी विचित्र अन थोडी दमदारी

बनून आपल्या कल्पनेचा पुढारी

एकवावी वाटते माझी कल्पना भारी


होत एक गाव थोडं विचित्र सारी

राहायचे तिथे थोडे माणसं हजारी

आनंदी त्यांच जीवन अन शान होती भारी

पण एक दिवस घडल असं जणू काटे शहारी


गावात आला एका कुत्रा बनून दमकट भारी

आकार होता त्याचा जणू डायनसोर सारी

त्याच्या पुढे माणुसही वाटायचा चिरकूट धारी

कुत्रा होता विशाल अन होता भयानक भारी


गावात ठेवला त्यानं पाय बनून कलंदर वाणी

सगळे धावाले लागले जीव मुठीत घेऊन सारी

माणसांना वाटल हा आता आपल्याला मारेल भारी

खाऊन टाकेल आपल्याला अन आपण होवू स्वर्गवारी


त्याच्या भीतीने गावकरी पळाले लागले सारी

घेऊन मुठीत जीव गावकरी धावले तर तर तारी

काही लपले घरात बनून स्वतः सावकारी

तर काही घुसले दुसऱ्याच्या घरात सुर सुर सुरी


तो कुत्रा होता विशाल टनत्कारी

त्याला पाहून माणूस घाबरून होता भारी

काही माणसानी केली त्याच्याशी लढण्याची तयारी

म्हणून काढल्या घरच्या जुन्या गंजलेल्या तलवारी 


कुत्रा आला गावाच्या मध्ये अन् पाहू लागला वरून 

मंग आला कुत्रा खंब्यापाशी अन् गेला सु सु करून

सु सु करून झाल्यावर तो गेला गाव पार सोडून 

ते सगळं पाहून गावकरी हसले पोट भरून भरून 

सगळं पाहून गावकरी हसले पोट भरून भरून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy