सासू सुना सुनवी...
सासू सुना सुनवी...
आज सासूबाईंना आलेला मूड...
आणि त्यांनी केली माझी बोलती गुल..
(सासूबाई )
कसं ग समजावू तुला... बघून त्रास होतो मला...
जीन्स घातली तरी लाव ना टिकली कपाळाला....
हिरवा चुडा नको पण दोन तरी घाल बांगड्या,
शोभा नसते पैंजणाशिवाय पायाला...
फेरवेचा मुद्दा तर आता दूरच राहिला!
मुहूर्तमणीची जागा पेन्डलने घेतली आता...
काळे मणी कमी नि सोन्याचा भपका जादा...
कसं समजावू ग सुनबाईं तुमच्या पिढीला...
