ओंजळभर फुले...
ओंजळभर फुले...
आमचे हे,
ओंजळीत आज घेऊन आले मोगरा...
पाहूनी फुलं, माझा चेहरा झाला हसरा..
म्हणाले मी, आज बरा आणला गजरा...
तुम्ही कधी पासून शिकलात हो हा नखरा...
(ह्यांचे उत्तर ऐका)
अग, फुलवालीकडे सुट्टे नव्हते रूपये पंधरा...
फुले देत म्हणाली, आज खुश करा तुमच्या सुंदरा.

