STORYMIRROR

Rekha Gavit

Comedy

3  

Rekha Gavit

Comedy

फजिती...

फजिती...

1 min
246

काय सांगू? मित्रा तुला, काल ती कॉलेजात दिसली....

पोरगी अशी सुंदर, तिचे सौंदर्य असली....

लाजून माझ्याकडे टाके ती कटाक्ष....

माझे पूर्ण तिच्याकडे एकटक लक्ष....

ठुमकत आली, ती माझ्या रे जवळ....

हळूच पुढे करे तिची नाजूक ओंजळ....

मी तर झालो खुश खूप मनी....

आजूबाजू काही नाही दिसे,नाही ध्यानीमनी...

हळूच मूठ उघडून राखी काढली तिने....

मी झालो दुःखी, काय माझ्यात उणे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy