आहे मी प्यादा...
आहे मी प्यादा...
केवढा तो भार कामाचा, कायम वाटे मला ज्यादा.
सगळ्यांना वाटतो मीच मुख्य, परी आहे मी प्यादा.
शिकण्या साठी ज्यास्त काही, किती झालिया बाधा.
वाटते त्यांना मी कायम असेन, मनाचाच वादा.
सारे रस्ते साऱ्यानाच मोकळे, हा व्यवहार आहे सादा.
साऱ्यांना रडण्या, तयार आहे माझा खांदा.
आप आपले कर्म करुनी, सारे सुखात नांदा.
झाली गडबड जरी, मग सुखाने पांगा.
सगळ्यांना वाटतो मीच मुख्य, परी आहे मी प्यादा.
बोललो परखड तर वाटे, साऱ्यांना पंगा.
सारवा सारव नंतर होई, आधी असतो दंगा.
तरी बरे साऱ्यांना माहित आहे, आप आपला धंदा.
सगळ्यांना वाटतो मीच मुख्य, परी आहे मी प्यादा.
विचारांची विचारांना, कसली झाली आहे बाधा.
तुम्ही मनता तोच, आणी सांगता काय कायदा.
मारणाऱ्यानेच मरत राहावे, असा कसला पायंडा.
सगळ्यांना वाटतो मीच मुख्य, परी आहे मी प्यादा.