एका वळणावर...
एका वळणावर...
एका वळणावर...
याच दिवशी संध्याकाळी ते वादळ शमले होते ,
कुठल्या एका वळणावर रक्ताने गुरफटले होते...
एक जोरदार धडक वलय हवेच थांबले होते ,
स्तब्ध झाला प्रवाह डोळ्यांनीच हेरले होते ...
कितीतरी स्वप्न अपूर्ण आता शांत निजले होते,
ठेचाळले जीवन त्याच वळणावर वळले होते...
मागे होते सारे गणगोतं पण ओठ कोरडेच होते,
आठवांचा पसारा ठेऊन विलीन अनंतात झाले होते...
आजही डोळ्यातले पाणी डोळ्यांतच सुकले होते,
ओजंळीत घ्यावया शेवटचे श्वास कुठे उरले होते ...
काळ्या पांढऱ्या नभांनी जेव्हा भरून येते आभाळ ,
शमलेलं वादळ रक्तात माझ्या जागे होते ...
थरथरते बोटं शब्दही थुजे वाटते तेव्हा ,निशब्द मी ...
आभाळ मात्र डोळ्यांतुन रिमझीम रिमझीम बरसत होते ...
