अस्तित्व
अस्तित्व
अस्तित्व तुझे भु लोकी
कधी भासलेच नाही
श्रद्धा फक्त मनात
जाणीव कधी झालीच नाही //
दाखवून भय तुझे
लोक हित साधतात
उभारुनी मंदिरे तुझी
नवा व्यापार थाटतात //
दुध फळे भोग तुला
अर्पण हे करतात
भिकारी पायरीचे
पायापडून मागतात //
दान देउन लक्ष कोटीचे
पापे आपली लिपतात
लाच देउनच तुला
कर्मयोग साधतात //
ठावूक नसावी रुपे
बहुदा तुला येथील तुझी
जाती धर्म पंथात तु नांदे
रुपे तुझी किती किती ? //
तुझे उरुस तुझीच यात्रा
कामी पडते का तुझी मात्रा
नावाने तुझ्या हे सगळे
गोर गरीब लूटतात //
आत्मी जर वास्तव्य तुझे
का तु ना भेटे कधी
स्वार्थाच्या या दुनियेत
तूच विसरला माणुसकी //
काय वाटते तुला हे पाहून
यांना कसे कळनार
प्रश्न अस्तित्वाचा तुझ्या
तु कधी रे जागनार //
