एक शिक्षिका होण
एक शिक्षिका होण
येवढही सोप नसत रे गड्या
एक शिक्षिका होण
जिजाऊची सावित्रीची माझ्या रमाईची
लेक होण ||
दगडगोटे शेण चिखल
झेलून गेली ती सावित्री
तिच्या पावलावर पवल आमची
ध्येयाची ती आसक्ती
समाजाच्या पुढे होऊन अस ठाम उभ राहण ||
मायबापाचा विश्वास होऊन
तो सार्थ करण्यासाठी कष्ट उपसण
समाज व्यवस्थेचे निखारे पायाखाली घेत
जिद्दीने आपल ध्येय गाठण ||
बापाची लेक
सासरची सुन
मुलांसाठी गुणवान माता अन
त्या समोर बसलेल्या लेकरांसाठी एक आदर्श होण ||
संस्कार पेरुन विद्यार्थ्यांत
आपल कर्तव्ये निर्वाहन करण
जोखंड घेऊन समाजाच
पुरुषा सोबत बरोबरी साधण ||
खांद्याला खांदा अन उरात जिद्द घेउन
व्यवस्थेच्या चाकरमाणीत राबराब राबण
घर दार गणगोत सर्वकाही संभाळून
स्वतःच्या पायावर भक्कम पणे उभ राहण ||
भेट्ले सोबती चांगले जरी आपसुक
इगोचा अंगार घेउन आयुष्य काढण
समाजाच्या त्या विखारी नजरा अन
कोलित लज्जेच हृदयात घेउन फिरण ||
अपेक्षांच्या ओझाचा भार पेलत
ते जीवन सार्थकी लावण
मागेवळुन पहाताना फक्त
आठवांचा तो गोफ विणत जाण
आठवांचा तो गोफ विणत जाण ||
