माणुस घडते
माणुस घडते
निळ निळ आकाश अंतरंगात समावुन घेते ,
उसळते ती लाट अशी स्पर्श आभाळाला करू पाहते ...
उसळून उसळुन लाटा किनाऱ्यांवर आदळते ,
मी शांत बसुन अथांग पाण्याचा तळ गाठते ...
धावणाऱ्या या जगात एकटाच मी जणु ,
गतीहीन आयुष्याच्या प्रेमात डोहात बुडते...
श्वास रोखून जरासे मी दुनियेकडे बघते,
सुंदरता तेव्हा कळते जीवनाची किमया घडते...
अलगद तरंगत जाते त्या जीवनाच्या समुद्रात,
कुठे होते प्रारंभ आणि शेवटी काय उरते...
थांब थोडासा चोरून घे दोन चार क्षण आयुष्याचे,
स्वतःला शोधल तरच माणुस घडते ...
