STORYMIRROR

Deepali Mathane

Abstract Tragedy

3  

Deepali Mathane

Abstract Tragedy

भावनांचा ओलावा

भावनांचा ओलावा

1 min
258

भावनांचा ओलावा मनाला भिजवतच नाही

पापणीतले स्वप्न डोळ्यांना निजवतच नाही

   शुष्क भावनांचे बंध मला उमगतच नाही

   भावनांचे सूर आजकाल गुणगुणतच नाही

कासावीस जीव धीराचे शब्दचं येतं नाही

सोडूनी शृंखला तळमळीने कवेत घेतं नाही

   अपेक्षांच्या भाराने आता मनं पण गुदमरत नाही

   मेलेल्या जाणीवांचे आता अवशेषही उरत नाही

खोल जखमांच्या आज वेदनाही छळत नाही

अंतर्मनातील संघर्षाला काहीच कळत नाही

    शोधीत विसावा हक्काचे ठिकाण मिळतच नाही

   हसऱ्या प्रेताची वाट काही केल्या जीवनाकडे वळतच नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract