STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मम अस्तित्व

मम अस्तित्व

1 min
231

अस्तित्व माझे अणूरेणूंचे

सुखवित होते मातेला

तनमनाला लहरींचे

आंदोलन नव गर्भाला


जन्मानंतर तिनेच मला

वाढविले, शिकविले

जपूनी फुंकर घालूनी

मम अस्तित्व फुलविले


शुभमंगल सावधान होता

स्वामिनीपद मिळविले

कणाकणात पतीदेवाच्या

मम अस्तित्व भिनविले


सुंदरशा गोकुळात

हर्षभरे नाहले

अस्तित्वात गोपाळांच्या

नकळत मिसळले


येता पैलतीर दृष्टीपथी

शोध स्वतंत्र अस्तित्वाचा

मिळे पुस्तके, सुरांमधे

गप्पा, गाण्यांमधे तयाचा


देवामधे अस्तित्व दिसे

भक्तीरस आळविता

चराचरात, मनामनात

दिसे अस्तित्व शोधिता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract