STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

'मी'पण

'मी'पण

1 min
233

बसे आज तळ्याकाठी

संथ शांत संध्याकाळी 

खळबळ मनातली

विसावून सैलावली    (१)


राग लोभ क्रोध रिपू

निवळले अंतर्मनी

निरर्थक बोल मीच

दूर फेकले गाळूनी     (२)


अपमान शल्य सल

दुःख दाह अंतर्मनी

त्वरे टाकले काढूनी

उपटूनी मनातूनी       (३)


झाले शुद्ध स्वच्छ मन 

केले अध्यात्म शिंपण

विरुनिया गेले सारे

मन्मनीचे ते 'मी'पण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract