पण....पण....पण
पण....पण....पण
वजन कमी करण्याचा
मी *पण* केला मनात
विचार कँलरिजचा
खमंग वास घरात (१)
नाश्ता दूध फ्लेक्स
थोडी साखर चालते
चिमूट बोर्नव्हिटाची
रंग लज्जत आणते (२)
कोरोनानंतर पार्टी
चक्क वाडेश्वरमधे
मनोमनी मांडे खात
गेले मी *पण* हाँटेलमधे (३)
छान छान फर्मायशी
अप्पे गरम गरम
*पण* आडवा पथ्याने
वासानेच झाले नरम (४)
"मनीषा ताव मार"
तू *पण* खा मनसोक्त
पथ्य आता विसर गं
होऊन जाऊ दे यथेच्छ (५)
हो नाही करता करता
*पण* सरला मागुती
इच्छाभोजन झाले
हसतखेळत संगती (६)