हिरवंगार झाडांसारखं....
हिरवंगार झाडांसारखं....
हिरवंगार झाडांसारखं असावं आपलं जीवन,
पालापाचोळयासारखं का भरकटावे आपलं मन...
हिरवंगार झाडांसारखं सदा राहावं टवटवीत,
दुःखाची गाणी बदलून सुखाची गाणी गावीत...
हिरवंगार झाडांसारखं असावा आपला बहर,
करावी आनंदाची लूट शाश्वत सुखाचा कहर...
हिरवंगार झाडांसारखं असावं संसारी अलिप्त,
फुटावी सुखाची पालवी दुःख,वेदना व्हाव्या लुप्त...
