श्रावण
श्रावण




आनंदाची उधळण।
धरतीला वरदान।।
निसर्ग टवटवीत।
धरणी ही सुशोभित।।
रंगीबेरंगी सुमन।
सजून जाई अंगण।।
पावसाने बने नक्षी
नाद करतात पक्षी
हरित तृणांचा स्पर्श
अनुभव देई हर्ष
इंद्रधनू नभी असे
लोभस ते दृश्य दिसे
नाजूक फुलपाखरे।
हवेत स्वछंद फिरे।।
धुके सर्वत्र पसरते।
मन आनंदी करते।।
श्रावण उत्सव मास।
व्रतवैकल्याचा ध्यास।।