STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

# बळीराजा

# बळीराजा

1 min
268

राजा राबतो शेतात

ऊन वारा असो पाणी

जीणे श्रमिकाचे याचे

गातो श्रमाचीच गाणी


जोडी घेऊन बैलाची

बघा चालला डौलात

अरे जगाचा पोशिंदा

इथे राबतो शेतात


कष्ट जीवापाड केले

सोने शेतात पिकवले

अस्मानी अन् सुलतानीने

कसे मातीमोल केले


गेले उभे पीक वाया

पैका नाही हो पेराया

होतो हतबल राजा

डोंगर कर्जाचे फेडाया


राज्य हिरवे शिवाराचे

म्हणे राजा बळीराजा

अरे राजा होणे इथे

बघ वाटतसे सजा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics