गंध पावसाचा
गंध पावसाचा
गंध पावसाचा दरवळुन गेला
चेतुुऊन गेला अंतरंगातील तारा
साजिरा गोजिरा हवाहवासा वाटणारा
गंध पावसाचा फुलऊन गेला
आठवणिंचा रंगित मळा
गडद पुसट दाटणारा
गंध पावसाचा शब्दातीत सारा
कवितेतून पसरला मोराचा पिसारा
नयनमनोहर न्रृत्याचा डोलारा
गंध पावसाचा एक अनमोल नजारा
ऋतुंना बिलगला वर्षावास सारा
निसर्गाच्या शिरपेचातील सोनेरी तुरा
गंध पावसाचा पसरुन न्यारा
अनमोल नजारा ठेऊन गेला
मातित रुजला दर्प सुगंधाचा सारा
