कृष्ण
कृष्ण




कंसाच्या तुरुंगात
कृष्ण जन्मला
वासुदेवाच्या डोईवर
टोपलीत निघाला
देवकीचा बाळ
सावळा सुंदर
यशोदेचा कान्हा
मुरली मनोहर
कृष्णाच्या गळ्यात
शोभे वैजयंतीमाळा
दहीदूध चोरती
भाव भोळा
सवंगडी, गोपिका
होती स्तब्ध
बासरीच्या माधुर्याने
करता मंत्रमुग्ध
गोपिकांची भरलेली
घागर फोडी
करुनि खोड्या
लावे गोडी
राधेलाही कृष्णावर
प्रीत जडली
मीराबाई कृष्णभक्तीत
बुडून गेली
सुदर्शनचक्र घेऊनी
उजव्या हाती
बंद करती
असुरांची बोलती
अर्जुनाला कृष्णाने
भगवद्गीता ऐकवली
सारथी बनून
साथ दिली