STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

4  

Jayshri Dani

Classics

वाळूचे घर

वाळूचे घर

1 min
387

नदीकिनारी

वाळूचे घर

बांधताना का

डोळ्यांत सर


डोळ्यांत सर

मनात कढ

झिम्माड ओली

आषाढ झड


आषाढ झड

निळे अंबर

वेलीवरती

शुभ्र झुंबर


शुभ्र झुंबर

शुभ्र कळ्यांचे

भिजली झाडे

शेत मळ्यांचे


शेत मळ्यांचे

गूज अंतरी

घर वाळूचे 

नदीकिनारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics