प्रेमातील गोड तक्रार
प्रेमातील गोड तक्रार
मी प्रेम वेडी
करते प्रीत
जगा वेगळी
आहे ती रीत
माझ्या मनीचे
कळावे तुला
का न उमजे
खंत ती मला
नव्याने किती
तुला सांगणे
तरी मनात
न तेआणणे
किती अबोला
नको रुसवा
आण ना जरा
मनी गोडवा
नको मजला
नभीचे तारे
रहा जवळी
मिळाले सारे