STORYMIRROR

mahesh gelda

Abstract Others

3  

mahesh gelda

Abstract Others

हरवलेली वाट

हरवलेली वाट

1 min
185

विचारांच्या गर्दीतून स्वतः ला शोधताना

दिसले मला आभाळ जमिनीला टेकताना

खूप कष्ट, भरपूर प्रयत्न, मेहनतही करणार


ध्येय होते माझे गवसणी आभाळाला घालणार

परंतु हे काय झाले,

शोधत आपल्याला आभाळच खाली आले


आश्चर्य तर झालेच पण आनंद अधिक झाला

गवसणी घालायचा प्रयत्न आता वाचला


मेहनत वाचली कष्ट वाचले काम सोपे झाले

आपल्यावरच खुदा मेहरबांन झाला वाटले


चालू लागले त्या दिशेने आभाळाच्या शोधात

पोहचण्याआधीच रंगवत बसले स्वप्न मनातल्या मनात


जशी जशी पुढे पुढे मी जात होते

नशिबाच्या माझा मी अंदाज लावत होते


खूप चालले खूप चालले आता मात्र थकले

दिसत होते आभाळ पण पोहचू नव्हते शकले

तेवढ्यात आकाशवाणी झाली,


मृगजळामध्ये ह्या तू वेडी झालीस

टेकलेले आभाळ क्षितिजालाच समजलीस

अग उंच उडी घेतल्याशिवाय आभाळ कधी

गवसेन का?


यशाला या नसतो शॉर्टकट आता तरी कळेना का

योग्य दिशेने प्रयत्न कर नकोस बसू रडत

ध्येयाला या समोर ठेव तत्वांची जोड दे बाकी गेले उडत


कारण

आज जरी हरवलेली आहे तुझी वाट

मोहामध्ये हरवू देऊ नकोस तुझ्यातली लाट.                      


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract