दामाजीपंत
दामाजीपंत
आहे पैसा नाही पैसा सर्वत्र आहे काळजी चिंता
कसा खेळ रचिला तू भगवंता
आहे ज्याच्याकडे पैसा भरपूर
आनंदाने त्याचा भरलेला ऊर
पण डोळ्यावर झोप नाही दिवसरात्र
पैसा नाही ज्याच्याकडे त्याचेही दिवसरात्र उघडे नेत्र
परिवाराला कसे द्यायचे सुख
पोटाला चिमटा तरी असतो हसतमुख
हमालही उचलतो गव्हाचे ओझे पण नाही विकत शकत घेऊ
पैसा आहे तो घेतो विकत पण आजार मोठे नाही शकत खाऊ
पैशाची ही जादू किमया विचार करायला लावते भाग सांगणे एक नको वाह्यात उधळपट्टी
नको डोळ्यावर पैशांची धुंदी स्वप्न बघायला नाही बंदी
