झाडाचे दु:ख
झाडाचे दु:ख
ओल्या झाडावर घाव
जसा कु-हाडीचा पडे
रक्त भांबाळ ते झाड
मना मनातच रडे
बुंध्यापासी झाडाच्या त्या
किड्या मुंग्यांच रे घर
घाव पडे बुंध्यावर
मुंग्या पळे दुर दुर
फांदीवर झाडाच्या त्या
चिऊ काऊच रे घर
घाव बसता फांदीवं
स्वप्न पडे भुईवर
फुले डोलती पानातं
नव्या बीज जन्मासाठी
घाव बसता फुलावं
आता कोण पाटीपोटी
घाव घाला तुमच्या बी
हाता पायावर आज
दुःख सोसूनच बघा
सारा उतरेल माज
