मैत्री
मैत्री
1 min
79
सुख दुःखाच्या क्षणांत
साथ मैत्रीला देत चला,
चिमुकल्या यशालाही
आनंदाने मिरवीत चला
आहे कुणी सोबत म्हणून
धीर जरासा मिळेल
आत्मविश्वास वाढविणारा
आधार मैत्रीचा मिळेल
तुझं माझं असं काही नाही
असाच मैत्रीचा नारा,
असावा मित्रपरिवार सर्वांचा
एकमेकांना समजून घेणारा
टिकून राहो नेहमी
अशीच गोड ही मैत्री,
एकमेकांस सांभाळून
घेण्याची अशी ही खात्री