शेतकराची पोर
शेतकराची पोर
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
पाहिजे ते देईन एकदा तरी मागून घ्या
आमची भूमी, सत्ता गाजवणार तुम्ही
फाशी घेण्या दोर, तेवढा तरी आणून द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
खत वाढवल, बी वाढवल
महागाईच तर सोडूनच द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
बारा महीने कष्टकरी, आम्ही जातीचे शेतकरी
आमच्या मुलाबाळा पण शिक्षण द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
सरकार कुणाचं, गरीबांच का व्यापाऱ्याच
ते पण आम्हा कळून द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
शहरातून शहरात जाण्या, फास्ट रेलवेची योजना
आमच्यासाठी तूटकी मुटकी एस टी तरी पाठउन द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
एक तरी पुरवा सादा, तुम्ही केलेला वादा
नाही तर सुखाश्री खातो आम्ही ते तरी खाऊन द्या
आम्ही कोण? ते पण एकदा सांगून द्या
