वडील
वडील
तुझ्यासाठी कित्येकांपुढे त्यानं मागितली भिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...
जन्म दिला आई ने
बापानं खेळवलं अंगा खांद्यावर
तुझ्या साठी झोका त्यानं
बांधला शेताच्या बांदा वर
तू रडते म्हणून तोही रडला
त्याच्या आश्रुंच मोल तू जाणायला शिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...
बोट लावशील तो कपडा,
म्हणशील ती चप्पल
विचार नाही केला त्यानं
सारं परिस्थितीला झेपलं
तुझ्या हौसे साठी तो रात्र-दिवस राबला
त्याच्या कष्टाचं मोल तू जाणायला शिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...
स्वप्न पाहिलंय त्यानं मोठं
शिकून सवरून मोठी होशील
साहेब बनून मिरवत येशील
त्याच्या या स्वप्नासाठी तू जगायला शिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...
तुझ्यासाठी त्यानं खाल्या किती खास्ता
उपसलेतं सारे कष्ट
वय झालं तुझं पोरी
त्याला बोलता येईना स्पष्ट
आपण काय शिकतोय, काय वागतोय
स्वतःच्या मनाला विचारायला शिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...
तुझ्यासाठी कित्येकांपुढे त्यानं मागितली भिक...
पोरी बापाच्याही मनासारखं थोडं वागायला शिक...