STORYMIRROR

mahesh gelda

Others

2  

mahesh gelda

Others

दुरावलेली मैत्री

दुरावलेली मैत्री

1 min
69

नको मला कुणाचे

पाच मिनिट भेटीचे,

भेटी नंतर दूर झालेले,

क्षण टोचतात आठवणीचे


हरवला कुठे तरी,

मैत्रितल्या गप्पांचा तो कट्टा

Whatsapp, फेसबुक ने,

मांडली न बोलता शब्दांचीच थट्टा


साथ होती मैत्रीची

म्हणून झाली कमी ओझी

आता न मारवेना हाक

कारण स्टेटस त्यांच बिजी


सोबती चालणारे सुद्धा

आता कोणी न सोबत उरले

कारण आयुष्याच्या रेस मधे

सर्वानीच फॉर्म भरले


म्हणून नको मला कुणाचे

पाच मिनिट भेटीचे,

भेटी नंतर दूर झालेले,

क्षण टोचतात आठवणीचे


Rate this content
Log in