तू माणूस बनून ये
तू माणूस बनून ये
सोडून तुझ्यातला मी पणा
थोड स्वत:लाच समजून घे
क्रूरपणाची कात टाकुन
तू माणुस बनुन ये.....
अहंकाराला बाजुला ठेऊन
स्वाभिमानाने जगुन घे
नको नुसताच मोह वेडा
तू विठूरायाचा वारकरी बनुन ये.....
संकुचित वृत्तीचा त्याग करून
खुले आकाश कवेत घे
आंधारलेल्या जीवनासाठी
तू तेजोमय दिवा बनुन ये.....
हातांना देण्याची सवय लाऊन
गरजवंतांना जवळ घे
नुसता क्रूरतेचा कहर नको
तू बासरीची धुन बनुन ये.....
थांबवून स्वप्नात रंगणे
वास्तवास तू जाणुन घे
हिंस्त्रपणाची हत्या करून
तू कल्पतरू बनुन ये.....
झटकून कलंक बुद्धीचा
संतपिढी घेऊन ये
रोवुन गुढी माणुसकीची
तू माणुस बनुन ये......
