वंदना
वंदना

1 min

309
निःस्वार्थ वाहे ध्यान गंगा
साध्य करा अमूल्य मोत्यांना
योग्य ध्यान मिळो प्रत्येका
हीच खरी ईश्वर चरणी वंदना..
नमन करावे निसर्गाला
घ्यावा आशीष ब्रम्हांडाचा
नित्य,आभार मानावे धरेचे
हीच खरी ईश्वर चरणी वंदना...
प्रणाम करावा सकलजनांना
घ्यावा आशिष सर्व जेष्ठांचा
शुभम विचारांची म्हणावी प्रार्थना
हीच खरी ईश्वर चरणी वंदना....
दीर्घ चिंतावे आनंदी क्षणांना
जपावा मंत्र शुद्ध वचनांचा
कराव्या माळा संस्काराच्या सदा
हीच खरी ईश्वर चरणी वंदना....