STORYMIRROR

Mayuri Kahale

Others

3  

Mayuri Kahale

Others

पाऊस

पाऊस

1 min
174

अलगत माझ्या अंगणी

ओसरल्या पाऊस धारा

मज चिंब चिंब करतो

वाहणारा खट्याळ वारा !!१!!


नेहमीचा पाऊस असतो

पण नव्याने का भेटतो

मौसमापरी प्रत्येक मनात

वेगळाच का भीडतो !!२!!


बालपणीचा सहवास

स्मरणात माझ्या खेळतो

तळ्यात कधी मळ्यात

हा खेळ चिखलात रंगतो !!३!!


मुक्त होऊन बरसतो

पाऊस या धरती वर

सौंदर्य वाढते निसर्गाचे

डोळ्यांनी टिपावे मनभर !!४!!


रिमझिम कधी बेधडक

आवेग तुझा कळत नाही 

कधी रुद्र कधी सौम्य

पावसा तू उमजत नाही !!५!!


Rate this content
Log in

More marathi poem from Mayuri Kahale