STORYMIRROR

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Inspirational

3  

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Inspirational

थांबून पाहावं का थोडं ?

थांबून पाहावं का थोडं ?

1 min
204


थांबून पाहावं का थोडं ?

वाटत माझ्याही मनाला ..

परंतु दूर तर सारू शकत नाही..

अलगद फुलवलेल्या संसाराला..


रोजचीच ती घाईगडबड..

कधीतरी जीवावर येते..

आपल्याच माणसांसाठी आहे ..

मी स्वतःच स्वतःला पटवून देते..


पण काळ सरत चालला आहे..

माझं जगायचं राहून जातंय का ?

खरंच माझ्या नसण्याने ..

सारं काही अडेल का ?


थांबून पहायचं आता थोडं..

आता मी मनाशी ठरवलं आहे..

कितीही कर्तव्यदक्ष असले ..

तरी मलाही आयुष्य जगायचं आहे ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract