मी विसरून भान सारे
मी विसरून भान सारे
मी विसरून भान सारे..
तुझ्या डोळ्यांत हरवून जाते..
आश्वासन त्या डोळ्यांतले..
मला सुखावून जाते..
मी विसरून भान सारे..
तुझे बोलणे ऐकत राहते..
स्तुती माझीच तुझ्या मुखातून..
ऐकता भान हरपते..
मी विसरून भान सारे..
तुझ्याकडे पाहत राहते..
मनमोहना तुला पाहता..
संसार ताप विसरून जाते..
मी विसरून भान सारे..
तुझेच गीत गाते..
प्रेमाच्या या निर्मळ नात्याला..
भक्तीचे रूप लेवविते...
मी विसरून भान सारे..
तुझ्या स्पर्शात विरघळते..
आश्वासक त्या स्पर्शाने..
दुःख दैन्यही विसरते..
मी भान विसरून सारे..
तुझ्या मिठीत सामावते..
साऱ्या जगाला मागे सोडून..
ही राधा कृष्णात विलीन होते..

