विरह
विरह
विरह सरता सरेना ही असह्य होते रात
भेटीच्या आशेपोटी मन मिणमिण जळती वात
वाटते अजुन तू येशील डोळ्यांत पौर्णिमा घेउन
तुझ्या मनी असलेल्या आठवांत ओला होउन
महालात त्या तिथल्या वृंदावन स्मरते का रे?
धुन अनंत संसारातुन राधेची स्फुरते का रे?
यमुनेच्या येशील तीरी मन आतुरले बघण्याला
मनमोहन त्या रूपाला लाघवी तुझ्या हसण्याला
परतेल कधी का मागे या कृष्णामधला कान्हा?
प्रेमाला पूरही येतो मायेचा झुरतो पान्हा

