झंकार
झंकार
पर्वा न मला कशाची
मन तुजपाशी जाते
सत्य ज्ञात असूनही
आस मनात उरते
द्वारकेचा राजा आता
माझा कान्हा न उरला
श्रेष्ठ कर्तव्य ठरले
प्रेम विसरून गेला
राधा ही एकटी मागे
आता जगास सांगते
माझ्या सख्याच्या मनी
प्रेम आजही वसते
भक्तिमय प्रेम माझे
मला भीती ना कुणाची
कृष्णनाम हे श्वासात
पर्वा न मला कशाची
आता अस्तित्व विरले
सारी जाणीव सरली
नाव तुझे निनादते
राधा झंकार बनली
-©तनुजा संतोष प्रभुदेसाई

