STORYMIRROR

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Romance

3  

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Romance

मी न माझा उरलो

मी न माझा उरलो

1 min
191

डोळ्यांत निर्मळ भाव पाहुनी तयात हरवून गेलो

आकंठ तुझ्या प्रेमात बुडालो, मी न माझा उरलो

तुझ्या पैंजणांच्या साथीला, साथ बासरी देते

नियती हसरी होते माझी हात हातात घेते

यमुनेच्या या तीरावरती किती सयींना जगलो

आकंठ तुझ्या प्रेमात बुडालो, मी न माझा उरलो

निष्पाप प्रेम हे आहे? की आहे अतुल्य भक्ती

तुझ्याकडे मज खेचत राधे, नेते प्रेमळ शक्ती

या पाशातुन खरे सांगतो कधीच ना मी सुटलो

आकंठ तुझ्या प्रेमात बुडालो, मी न माझा उरलो

भरल्यासरल्या द्वारकेत जर नाहिस माझ्याभवती

वृंदावनात साचुन घेतो तुझ्या पापण्यांवरती

गाताना मी तुझे सोहळे कणाकणातुन स्फुरलो

आकंठ तुझ्या प्रेमात बुडालो, मी न माझा उरलो 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract