गाफिल राहू नकोस..
गाफिल राहू नकोस..
घात होईल कोणत्याही क्षणी, गाफील राहू नकोस..
नव्याने एक संकट येईल,शांतपणे पाहू नकोस..
संकटांना तोंड दे धैर्याने, ते तुझ्या रक्तात आहे..
झुकायचे नाही आता, हाच निर्धार करायचा आहे..
जन्मतःच सहनशक्ती घेऊन, आहे तुझा जन्म झाला..
गाफील राहू नको, क्षणांत प्राण जाईल एकवटला..
गाफील राहू नको, मनी राहू दे हाच ध्यास..
संकटाशी झुंजत रहा, ठेव सदैव विजयाची आंस..
गाफील राहू नकोस, होऊ दे पुन्हा जागर शक्तीचा..
विझवू पाहतील तुला ते, तू दाखव इंगा स्त्रीशक्तीचा..
गाफील राहू नकोस, मोडून काढ संकटाला..
धैर्य अन शौर्याने उभी रहा, उत्तर देत समाजाला..
