Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सुयोग पंडित

Abstract Tragedy

3  

सुयोग पंडित

Abstract Tragedy

सल

सल

1 min
291

रिते सूर माझे कुणाही न कळले,

तुला शोधताना पुन्हा ते न जुळले ।

विसावा नको हा अता ह्या वनीचा;

सुगावा मिळेना जिथे जानकीचा,

कुण्या काजव्याच्या प्रकाशात जळले ।

रिते सूर माझे कुणाहीन कळले ।।

कुटीतून जेव्हा तुझा सूर विरला,

तुझ्या स्पंदनांचा खुळा नाद स्मरला;

तुझ्या आठवांनी जुने शब्द गळले ।

रिते सूर माझे कुणाहीन कळले ।।

उन्हाला कळावी वियोगार्त झळ ती,

विधीने दिलेली क्षणार्धात कळ जी,

कळे ना कळे का असे चित्र मळले ।

रिते सूर माझे कुणाही न कळले ।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract