लाॅकडाऊन ते अनलाॅक
लाॅकडाऊन ते अनलाॅक


प्रदुषण लाॅक, प्रवास लाॅक...
माणसं लाॅक, फास्ट फूड लाॅक...
कोरोनाने केली देवालये लाॅक!
वाहणारे वारे मात्र आहेत अनलाॅक!
पशुपक्षी, कीटकांचा संचार अनलाॅक!
वृक्ष ,लता, फुले,मृत्तिकेचा सुगंध आहे अनलाॅक!
कोरोनाने मात्र यांना केले अनलाॅक!
लाॅक खरंतर व्हायलाच हवे,
आता तरी शहाणपण यायला हवे,
माणसाचा हव्यास सुटतच नाही...
आपत्तीचं त्याला कळतच नाही!
यंत्राप्रमाणे मानव धावतो...
यंत्राप्रमाणेच तो बिघडतो!
काळ याच्या मानगुटीवर बसतो,
मग शेवटी कुठेतरी थांबतो!
माणसानं माणूसपण घालवलं,
चुकतंय काही, कोरोनामुळे जाणवलं!
स्वच्छतेचं भाकीत समजावलंय,
कपाळकरंट्यांना चांगलच रडवलंय!