STORYMIRROR

Snehal Joil

Abstract Romance Fantasy

3  

Snehal Joil

Abstract Romance Fantasy

नाते जन्मांतरीचे

नाते जन्मांतरीचे

1 min
449

गंध मातीचा

स्पर्श तो दवबिंदूला

उदात्त सूर्यकिरण

साद घालती धरणीमातेला

ऐसे असावे आपुले

नाते जन्मांतरीचे!


सागराच्या ओढीने

नदी वाहे दुथडीने

तृप्त व्हावे जगताना

तुझ्या सवे नांदताना

भव्यता येवो आपुल्या

जन्मांतरीच्या नात्याला!


मंदिरातल्या ज्योतीला

दंडवत तिच्या भक्तीला

निष्ठेने सांभाळून घराला

वाहून नित्य स्वत्वाला

स्वप्नवेडी मी जपते 

जन्मांतरीच्या नात्याला

        

तुला काय हवे,

मला ठाऊक नसावे

 खंत इतुकीच रे

 समजून तू घ्यावे

भगवंत तू भक्त मी व्हावे

पावित्र्य येई जन्मांतरीच्या नात्याला!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract