STORYMIRROR

Snehal Joil

Abstract Others

3  

Snehal Joil

Abstract Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
220

वसुंधरा ती सुकोमल भारी,

जणू नवयौवना नित्यता.

हाय रे करंटी मानवता,

हिसकाविती तिची सुबत्ता!

समजू शकेना तिची व्यथा...

समर्पित ती साऱ्या जगता.

कधी उजाड ओसाड होता,

तक्रार नोंद तिच्या ठायी नसता.

नित्य स्मित, संयमित सोसणे तिची गुणवत्ता.

पवित्र अशी माझी धरणी माता जी साहते संसार तापा.

जरी ती तावून सुलाखून निघता,

परि नव्याने उजळे तेजस्विता.

धन्य जाहलो उदरी तिच्या जन्मा येता!

 ऋतुंचे खेळ सारे,

ऊन पाऊस थंडी वारे,

करती वसुंधरेला बेजार सारे,

आनंदे झेले तयांचे पसारे

सुख ओसंडूनी देई निसर्ग ही सारे

सुस्वभावे ती साहे सुख दुःख समान सारे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract