एक उच्च महत्त्वाकांक्षी स्री जिजाऊ,
एक उच्च महत्त्वाकांक्षी स्री जिजाऊ,
एक उच्च महत्त्वाकांक्षी स्री .. जिजाऊ!
स्वराज्य रक्षक माऊली जिजाऊ,
कुटुंबावर निरतिशय प्रेम करणारी
संवेदनशील नारी, जनसेवा करणारी,
पतीच्या कार्यात सावली बनून राहणारी जिजाऊ,
स्वजनवत्सल,पण शत्रूंवर आग ओकणारी जिजाऊ.
जुल्मी सत्तेला निडर लाथाडणारी,
अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या ती झिजणारी,
सहचारिणी,पतीला परमेश्वर मानणारी... जिजाऊ!
पराक्रमी, तरीही नाती जपणारी जिजाऊ.
शिवबाची माय ती, कणखरता शिकवणारी,
पुत्राचे जीवन खऱ्या अर्थाने घडवणारी,
दुःखी रयतेसाठी डोळ्यांत अश्रू आणणारी ...जिजाऊ!
दुर्बलांच्या अन्यायावर संतापणारी जिजाऊ.
कावेबाज शत्रूंवर नजर रोखणारी,
घरभेद्यांना धारेवर धरणारी,
ध्येयासाठी आयुष्य व
ेचणारी जिजाऊ,
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारी जिजाऊ,
पुत्राकरवी मुघलांना राज्याबाहेर पळवणारी जिजाऊ.
तेजस्वितेचा दिवा हृदयात अखंड तेवत ठेवणारी ...जिजाऊ!
आजची 'मी' पण जिजाऊ आहे.
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल आहे.
संस्कार देणारी जननी आहे,
पती, मुलांना समज देणारी आहे.
सत्याच्या वाटेवर चालणारी आहे.
प्रेमाची ओतप्रोत सरिता आहे,
स्वाभिमानी, व्यवहारकुशल आहे.
ध्येयनिष्ठ जीवन जगणारी आहे.
आपल्या कामात देव पहाणारी आहे
आप्तजनांसाठी श्रमणारी आहे,
अतिरेक झाल्यास धडा शिकवणारीआहे.
संकटाशी दोन हात करणारी आहे.
कोणत्याही क्षणी प्रसंगावधान राखणारी आहे.
प्रसंगी अन्यायाविरुद्ध लढणारी आहे!
आजची 'मी' पण जिजाऊ आहे!