कोरोना गातो स्वच्छतेचे पोवाडे
कोरोना गातो स्वच्छतेचे पोवाडे


कोरोना कोरोना कोरोना !
भल्याभल्यांची केली याने,
दैना दैना दैना !
कोरोनाचे थैमान काही केल्या थांबेना ...
निश्चिंत मनावर 'आता' ताबा मिळवता येईना!
सावध झालो आपण
ठेवण्या स्वत:ची तैना,
मोकाट सुटलेल्या मानवाला तेव्हा उसंतही घेता येईना!
जीवनरूपी भरधाव गाडा... थांबला कुठेतरी,आहे ना?
थोरामोठ्यांचा आजवरी धुडकावून दिला सल्ला
कोरोनाने मात्र आपल्या वाईट सवयींवरच मारला डल्ला!
मुकाट्याने जो तो स्वच्छतेच्या मागे 'हात धुवून' लागला.
आतापर्यंत नाक उडवत,
तोंडे फिरवत,
चाललो होतो टेंभा मिरवत.
पहा अता मास्कमध्ये दडवून सारे,
आल्यागेल्याची राहतो विचारपूस करत!
कुटुंबवत्सलता,सामाजिक भान आणि स्वच्छतेचे पोवाडे कोरोना आला गात.
खाण्यापिण्याच्या सवयींवर बसला आळा,
सणावारांचे नीतीनियम कटाक्षाने पाळा.
पौष्टिकता पदार्थांतून,नात्यातून सांभाळा
घरातल्यांनाच देव माना, मंदिरांतुनि रमणे टाळा.