पाऊस
पाऊस
1 min
189
पाऊस येतो
बरसून जातो,
कुणाला आवडतो
कुणाला नावडतो
कुणी देई शिव्या,
कुणी रची ओव्या.
पाऊस येतो
बरसून जातो.
कुठे झोड झोड झोडपतो,
कुठे ठिपूस नाही गळवतो.
पाऊस येतो
बरसून जातो
कुठे रिमझिम रिमझिम नाचतो
कुठे उदास भयाण भासतो
पाऊस येतो
बरसून जातो
कुठे धरीत्रीला प्रसवतो
कुठे कुशीतला अंकूरच नेतो
पाऊस येतो
बरसून जातो.