आई विषयीच्या भावना
आई विषयीच्या भावना
उपकार थोर तुझे
कसे मी वर्णू आई
तुजविण मला या जगती
दुसरे दैवत नाही.
उदरी राहुनी तुझ्या तुला
मी किती मारील्या लाथा
तरी मला तु शांतपणाने
ऐकवल्या कृष्ण कथा.
जन्म दिला माते तु
अगणित झेलुनी कळा
परि कधीही लागु दिल्याना
दुःखाच्या मज झळा.
शैशवातच शिकवत होती
तुच पहिली गुरु
अंगाई अन बालगीतातून
केले शिक्षण सुरु
आयुष्य माझे सगळेच आहे
तुझ्या संस्काराचाआरसा
प्रत्येक वळणावर जीवनाच्या
उमटवलास तु ठसा.
सांग कशी होऊ मी
तुझी आता उतराई
हो तू माझी लेक पुन्हा
मी होते तुझी आई.